महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरूच होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्य विद्यागर यांनी दीड वर्षापूर्वी म्हटले होते. आज अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा पास होत बार्शीत इतिहास घडवला.
पहिल्यांदा यूपीएससी क्रॅक केल्यानंतर रेल्वे सेवेत अधिकारी असलेले अजिंक्य आज दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा पास झाले आहेत. सध्या ते गुजरातच्या वडोदरा येथे कार्यरत आहेत. आज दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा पास होऊन देशात ७१७ वी रँक मिळवत ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आयपीएस होण्याचं त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
अजिंक्य यांचे वडील प्रा. अनंत विद्यागर हे बार्शी येथील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई आशा जोगदंड-विद्यागर आगळगाव येथे मुख्याध्यापिका आहेत.
0 Comments