कोल्हापूर/प्रतिनिधी:
राज्य परिवहन महामंडळाचे नूतन महाव्यवस्थापक(वाहतूक) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते,त्याप्रसंगी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली,यावेळी उपाध्यक्ष संजीव चिकुर्डेकर यांच्याहस्ते सुहास जाधव यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी महाव्यवस्थापक(वाहतूक)जाधव म्हणाले की सध्या महामंडळ बिकट परिस्थितीतुन जात असून त्यावर मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न असून याकामी संघटनानीही सहकार्य करावे असे आवाहन केले,शिवाय चालक वाचकांच्या बैठकीत वाहतूक नियोजनासाठी सूचना मागविल्या आहेत त्यास प्रतिसाद देऊन,समांतर वाहतूक होणार नाही याचीही सर्वांनी दक्षता घ्यावी असे सांगितले.
यावर संजीव चिकुर्डेकर यांनी महामंडळाच्या हितासाठी संघटना सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही दिली,याप्रसंगी विभाग नियंत्रक रोहन पलंगे,वाहतूक अधिकारी शिवराज जाधव,यंत्रअभियंता सुनील जाधव,कामगार अधिकारी मनीषा पवार यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष बी आर साळोखे,कार्याध्यक्ष एस वाय पवार,खजिनदार नामदेव भोसले,सुनील फलले,रावण समुद्रे,कुलदीप हिरवे, परवीन पठाण,दिपाली येलबेली,सोनाली कोळी,मारुती पुजारी,विजय भंडारी,शिवाजी डांगे,उदय यादव,रणजित काटकर,ए ए नदाफ,फिरोज चौगुले, राकेश शिंदे आदी उपस्थित होते.
0 Comments