बार्शी/प्रतिनिधी:
उत्तर बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात गेल्या चार पाच दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने रेखा विष्णू मोहिते यांच्या शेतातील गट नं १८४ मध्ये असलेल्या बंधारा फुल्ल भरुन वाहू लागला परंतू पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बंधाऱ्याच्या साईडला टाकलेला भराव खचल्याने पाणी शेतात शिरुन शेताला नदिचे स्वरूप झाले असून शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसाने नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने संपूर्ण दिशाच बदलून शेतातून नदी वाहत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. संबधित महिलेचे पती वारले असून ती आपल्या मुलांचा उदरनिर्वाह शेती करूनच भागवतात परंतू गेल्या चार पाच दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने त्या महिलेच्या शेताचे नुकसान झाले असून बंधाऱ्यामुळेच शेतीचे नुकसान झाले, बंधारा माझ्या शेतात बांधला नसता तर माझे नुकसान झाले नसते असे रेखा मोहिते म्हणाल्या. मला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रेखा मोहिते यांनी केली आहे.
0 Comments