“एका दलित नेत्याला मुख्यमंत्री केल्यानं सिद्धू यांचा राजीनामा”


‘एका दलित नेत्याला राज्याचं मुख्यमंत्रीपद देणं सिद्धू यांना सहन झाले नाही. त्यामुळेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची राजीनामा दिला.’ असा गंभीर आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला आहे. सिद्धू यांनी मंगळवारी अचानक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत पंजाब काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप घडवून आणला.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये सिद्धू यांनी आपण ‘तडजोडी’ करू शकत नाही. यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हंटलं. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आपण काँग्रेस पक्षाचे काम अखंडित सुरु ठेवणार असल्याचं सिद्धू यांनी म्हंटलं आहे.

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची राजीनामा दिल्यानंतर पंजाब आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘सिद्धू यांच्या कृतीतून ते दलितविरोधी असल्याचं दिसतय. एका गरीबाच्या मुलाला राज्याचा मुख्यमंत्री करण्यात आलं. हे सुद्धु यांना सहन झाले नाही. हे दुःखद आहे.’

तत्पूर्वी, सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी, ‘सिद्धू हे अस्थिर व्यक्ती असल्याचं आपण याआधीच सांगितलं होत. अशा व्यक्तीस पंजाबसारख्या सीमावर्ती भागामध्ये वसलेल्या राज्याचा मुख्यमंत्री करणे योग्य नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments