सांगोला तालुक्यात शेततळ्यात पडलेल्या बायकोला वाचविताना बायकोसह पतीचाही मृत्यू

सांगोला/प्रतिनिधी:

सांगोला तालुक्यातील धायटी येथे शेततळ्यात पाय घसरून बायको पडली, बायकोला वाचवताना पतीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोविंद नारायण पाटील यांच्या शेततळ्यामध्ये शेतकरी पती-पत्नीचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पत्नी शीतल मल्हारी पुजारी (वय २२) व पती मल्हारी बाळू पुजारी (वय ३०) असे मुत्युची नावे आहेत. सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

(Advertise)

शेतकरी पती-पत्नीचा बुडून मृत्यू

धायटी येथील  गोविंद नारायण पाटील यांच्या गटात शेततळे असून. शीतल मल्हारी पुजारी ही साईपनचा  पाईप नीट करत असताना पाय घसरून शेततळ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी तिचा पती मल्हारी बाळू पुजारी शेततळ्यात गेला होता मात्र दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची खबर  पोलीस पाटील प्रवीण गायकवाड यांनी पोलिसात खबर दिली असून. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.

(Advertise)

धायटी गावावर शोककळा

गोविंद नारायण पाटील यांच्या शेततळ्यात पाय घसरून पडून नवरा बायकोचा मृत्यू झाल्याने धायटी गावावर शोककळा पसरली आहे. मल्हारी व शितल यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्याची मुलगी आहे.

Post a Comment

0 Comments