पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते (सोलापुर ग्रामीण) यांनी सोलापुर ग्रामीण जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात चोरून हातभटटीची निर्मीती होत असुन तिची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. दारू मुळे अनेक गोर गरीबांचे संसार उधवस्त होत असुन वेळ प्रसंगी काही लोकांना प्राणास देखील मुकावे लागत आहे. सदर बाबीमुळे सोलापुर जिल्हयात ऑपरेशन परिवर्तन हे अभियान सुरू केले आहे.
ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील दत्तक गाव बेंबळे ता.माढा येथे दि. ०४/०९/२०२१ रोजी बेंबळे ता.माढा येथे आम्ही पो.नि. सुरेश निंबाळकर स्वत: तसेच पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. १११ हजारे, पो.ना. १७२० पठाण, पो.ना. १२६४ भानवसे, पो.ना. ५३८ शेख, सरकारी वाहनाचे चालक पो.कॉ. १३२३ खंडागळे असे पथकासह जावुन बेंबळे गावचे हद्दीतील अवैध हातभटटी विक्री करणारे व काढणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची हात भटटी काढण्याची ठिकाणे तसेच विक्री करण्याची ठिकाणे पाहणी केली परंतु हात भटटी दारूची भटटी दारू मिळुन आलेली नाही.
बेंबळे येथील ठिकाणी दारूबंदी अधिनियम कलम ६५ ( ई ) प्रमाणे १) इंद्रजित वामन काळे वय ५८ वर्षे २) समाधान उर्फ पप्पु बळीराम काळे वय ३२ वर्षे ३) सविता सतिश भोसले वय ३० वर्षे सर्व रा. बेंबळे ता.माढा ४) अभिमान भगवान किर्ते वय ५० वर्षे रा.बेंबळे ता.माढा यांचे अवैध दारू विक्री करण्याचे ठिकाणाची झडती घेतली यांची बेंबळे येथील अवैध दारू विक्रीची ठिकाणे चेक करता अवैध दारूचा मुद्देमाल देशी विदेशी बोटल मिळुन आलेल्या आहेत.
अभिमान भगवान किर्ते याचेकडे अवैध दारूचा मुद्देमाल मिळुन आला नाही. वरील उर्वरीत तीन इसम यांचेवर टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे दारूबंदी अधिनियम कलम 578/2021 65 (ई), 580/2021 65(ई) 579/2021 65 (ई) प्रमाणे रा. बेंबळे ता.माढा येथील इंद्रजित वामन काळे वय ५८ वर्षे, समाधान उर्फ पप्पु बळीराम काळे वय 32 वर्षे, सविता सतिश भोसले वय ३० वर्षे. यांच्यवरती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर अवैध दारूची विक्री करणारे लोकांची व त्यांचे कुटुंबिय यांची घरी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी जाऊन त्यांना अवैध दारू विक्री करण्या पासुन परावृत्त करण्या करीता अवैध दारू विकी न करता इतर व्यवसाय करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत. तसेच ते अवैध दारू विक्रीचा व्यवसाय वारंवार कारवाई करून ही का करतात या बाबत त्यांचेकडे चर्चा करण्यात आलेली आहे. त्यांना चांगला व्यवसाय करून आपले कुटुंबाची उपजिवीका करून समाजामध्ये एक दारू वाला म्हणुन जगण्या पेक्षा चांगला कष्टकरी मनुष्य म्हणुन उपजिवीका करण्या करीता त्यांना प्रोत्साहीत करण्यात आलेले आहे. त्यांनी यापुढे अवैध दारू विक्री करणार नाही असे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सांगीतले आहे.
तेजस्वी सातपुते (जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण) यांचे संकल्पने प्रमाणे अवैध दारूची विक्री करणारे इसमांना इतर दुसरे व्यवसाय करणे करीता सहकार्य व परिवर्तन करण्याचे काम टेम्भुर्णी पोलीस स्टेशनने सुरू केले आहे.
ऑपरेशन परितर्वन योजनेमुळे टेम्भुर्णी भागातील सर्व सामान्य जनता पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांची स्तुती तर करणारच आहे परंतु दारू विक्रेते स्व:ता मध्ये किती परिवर्तन करून घेतात याकडे देखील सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.
0 Comments