ॲड. जीवनदत्त आरगडे,
अध्यक्ष - बार्शी शहर काँग्रेस कमिटी
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि नूतन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या शाब्दिक खडाजंगीचा व्हिडिओ नुकताच काही सोशल मीडिया न्युज पोर्टल वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांत देखील अशा प्रकारचा व्हिडिओ आणि बातम्या प्रसारित करण्यात आल्या.
लगेचच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार सोपल यांचे सख्खे शेजारी आणि आमदार राऊत यांचे कट्टर समर्थक दलबदलू पणा करून देखील स्वीकृत नगरसेवक पदाची खिसून खोबरे घालून केलेल्या खीरीची परात पदरी पाडून घेतलेल्या सुभाष शेठ लोढा यांनी पोलिसांच्या या दंडुके शाही कार्यवाही बाबत आमदार यांच्याशी वादावादी झाल्याने तात्काळ व्यापारी महासंघ यांचा सोमवार दिनांक २० रोजी पोलीस प्रशासनाच्या अरेरावी उद्धट कार्यवाही विरोधात व्यापारी बंद पुकारला.
आमदार आणि पोलीस निरीक्षक यांच्यात वाद झाल्या झाल्या व्यापारी यांना किती त्रास झाला इतर नागरिकांना किती त्रास झाला याचा अचानक साक्षात्कार लोढा यांना झाला.
त्या अचानक दोन माणसांनी ठरवून आमदार समर्थनासाठी केलेल्या त्या बंद विरोधात सोशल मीडियामध्ये बार्शीकर जनतेने उघड आणि सोपल समर्थकांनी लपून छपून याच्या त्याच्या पदरा आडून प्रचंड संताप व्यक्त केला गेला.
हा बंद व्यापारी महासंघाने आमदार राऊत यांच्या समर्थनार्थ ममत्व म्हणून पोलिसांच्या विरोधात आकस दाखवून आमदारांचा हस्तक आणि स्वीकृत नगरसेवक आणि काही सोयीचे व्यापारी यांना हाताशी धरून लादण्याचा घाट घातला असा सुर माझ्यासह बार्शीतील सर्व सजग तरुणांनी सोशल मीडियातून व्यक्त करून सगळीकडून सरसकट प्रचंड विरोध झाला होता.
त्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन बार्शी येथे पोलीस प्रशासन नगर, पालिका प्रशासन आणि जनता यांच्या मध्ये सुसंवाद होऊन बंद बाबत संभ्रम दूर होऊन स्पष्टता यावी आणि व्यापाऱ्यांचे बंदचे नेमके कारण काय आणि पोलिसांचे नेमके काय चालले आहे हे समजावे यासाठी समन्वय संवाद बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत मी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहभाग नोंदवला त्यावेळी छोटे पदपथ विक्रेते म्हणजे पथारी व्यापारी ज्यांना आपण छत नसलेले व्यापारी म्हणजे फेरीवाले म्हणतो त्यांच्या समर्थनार्थ काँगेस पक्षाची भूमिका मांडली
काँग्रेस सरकारने देशाचे नेते श्री राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता असताना अजय माकन केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून " पदपथ विक्रेता उपजीविका संरक्षण विनियमन अधिनियम २०१४ " street venders livelihood protection and regulation Act 2014 हा कायदा केला आहे. याचे स्मरण करून दिले.
या कायद्यामध्ये फेरीवाले पथारी व्यवसायिक यांना व्यवसाय करण्यास संरक्षण दिलेले आहे याची जाणीव उपस्थितांना करून दिली. प्रतिष्ठेचे जीवन जगण्याचा आणि व्यवसाय करण्याचा अधिकार भारतीय संविधानाचा आत्मा आहे. त्यानुसार कमी उत्पन्न गट असलेल्या जनतेने आपली स्वतःची अर्थव्यवस्था उभारली आहे. रस्त्यावर बसून कमी दरात चांगल्या गरजेच्या चीजवस्तू विकणे त्यातून स्वत: ला रोजगार निर्माण करून ग्राहकांच्या गरजा भागवणे हे पूरक अर्थव्यवस्थेचा भाग आहे.
एखादा छोटा व्यावसायिक हा ज्या ठिकाणी बसून त्याचा व्यवसाय करीत असतो त्याला पोलीस किंवा पालिका प्रशासन हुसकावून लावते त्याच जागेवर नागेश सारख्या गुंठा मंत्री झालेल्या मोठ्या श्रीमंतांची महागडी चारचाकी गाडी दिवसभर उभी राहिली तर ती मात्र चालते हे गरिबांबद्दल असलेल्या श्रीमंतांच्या द्वेष भावनेच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. अशी द्वेष भावना ठेऊ नये. देशा समोर बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे त्यात प्रत्येकाने आपापला रोजगार छोट्या मोठ्या व्यवसायात शोधला आहे. त्यामुळे नगरपालिकेने काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आणि बंधनकारक सुद्धा आहे याची जाणीव करून दिली. त्यानुसार व्यापारी , ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला, फेरीवाले यांच्या सहभागाने शहर फेरीवाला समिती ( Town vending committe) स्थापन करावी अशी सक्तीची तरतूद आहे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे त्या त्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असतात. या समितीने सर्वांशी चर्चा करून शहरात फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र यांची तालुका सूची घोषित करावे आणि फेरीवाला क्षेत्रात मागेल त्याला प्रथम प्राधान्याने फेरीवाला परवाने देऊन वाहतुकीला शिस्त लावून छोटे व्यवसायिक संरक्षित करणे गरजेचे आहे. ही सूचना केली.
बार्शी शहराच्या व्यापार पेठेवर शेजारील सहा सात तालुक्यांचा लोड आहे. शिक्षण आरोग्य या सोयींसाठी पाच सहा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांनी बार्शीत राहण्यास पसंती दिली आहे त्यामुळे शहराची प्रत्यक्ष लोकसंख्या जास्त आणि ऑन पेपर लोकसंख्या कामी दिसते. दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या वाढलेली आहे मात्र बार्शी शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुळ समस्या ही मोठ्या इमारतींनी इमारतीच्या नकाशाप्रमाने दर्शविलेल्या पार्किंग मध्ये व्यापारी गाळे काढून विकले असल्याने झालेली आहे सोमवार पेठेत असलेल्या शिवछत्रपती कॉम्प्लेक्स , भगवंत कॉम्प्लेक्स एवढ्या मोठ्या व्यापारी संकुलांची पार्किंग कुठे आहे. बिना पार्किंग बांधकाम परवाने आहेत का..? सर्वप्रथम अशा महत्त्वाच्या बाजारपेठेच्या रोडवर असलेल्या व्यापारी संकुल यांची पार्किंग कार्यान्वित करा त्यातील पार्किंगच्या जागेत व्यापारी आस्थापना तात्काळ निष्कासित करा तेथे पार्किंगची सोय होईल परिणामी वाहतूक कोंडी कमी होईल.अथवा पालिकेने स्वतंत्र काही ठिकाणी पार्किंग इमारती उभरव्यात पे अँड पार्क अशा स्वतंत्र इमारती उभारल्या तरी चालतील.
मी काल या बैठकीत याबाबत बोललो नाही पण माझी तर मनापासून सूचना अशी आहे की,
गांधी पुतळा ते वसंत बुक डेपो चौक येथील संपूर्ण वाहतूक संपूर्ण बंद करून तेथे "खुला बाजार क्षेत्र" घोषित करावे. या परिसरात जो रस्ता आहे त्यात सगळा खुला बाजार क्षेत्र घोषित करा मुंबईच्या " श्योर बाजार " प्रमाणे सगळे फेरीवाले भाजीवाले त्यातील रस्त्यावर मोठ्या परिसरात मुक्तपणे व्यापार करू द्यावेत. खरेदीला आलेले लोक हे इकडे गांधी शॉपिंग सेंटर समोर आणि यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या मागे आपापली वाहने उभारतील .
वाहतूक आंबेडकर कॉम्प्लेक्स उत्तर बाजूने अग्निशामक दलाच्या नव्या इमारतीच्या पुढील रस्त्यावरून सरळ पुढे जुन्या मंडईची इमारत पाडून पुढे प्रसन्नदाता मंदीर समोरून थेट कुर्डूवाडी रोडवर काढावी अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स च्या दक्षिण बाजुने पुढे काढावी. सोमवार पेठ संपूर्ण खुला बाजार फळे भाजी इतर फेरीवाले असे घोषित करावे. असे माझे मत आहे. मात्र इमारतीच्या खालील पार्किंगमध्ये पार्किंग दर्शवून व्यापारी गाळे विकल्यामुळे ही वाहतूक कोंडी काही प्रमाणात होत आहे. त्या पार्किंग तात्काळ सुरू कराव्यात आणि फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अशी माझी विनंती आहे.
ही बैठक नागरिकांच्या व्यापारी बंद विरोधातील सुर जास्तच बेसूर होऊ नये म्हणून आणि नागरिकांना सगळीच काळजी असल्याने होती त्यामुळे या बैठकीत ६० - ४० चे कमिशन वाटप नसल्याने सोपल गटातील एकही व्यक्तीने सहभाग होता.
0 Comments