बार्शी! ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गुळपोळी चोरीचा प्रयत्न फसला; पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांची माहिती



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी पोलीस स्टेशन हद्दीतील गुळपोळी ता.बार्शी जिल्हा सोलापूर गावात गुरुवारी रात्री २ वाजता  चोर (घरफोडी) उद्देशाने श्री खंडू हनुमंत काळे यांच्या घरी आले आहेत व घराचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

(Advertise)

हे कळताच गुळपोळी गावचे पोलीस पाटील श्री बाळकृष्ण पिसे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला   माहिती कळवली, त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले, संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे चोरांच्या लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि पुढील अनर्थ टळला. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments