पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे पाहण्यासाठी गेलेल्या एक जण सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून भीमा नदी पात्रात पडल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडे कामाला असणाऱ्या हुसेन रझा असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. पंढरपूर तालुका पोलिसांकडून वाहून गेलेले युवकाची शोधमोहीम भीमा नदी पात्रात राबवण्यात येत आहे.
गुरसाळे येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. भीमा नदी पात्र वरील पूल बांधण्याच्या कामावर कामगार म्हणून हुसेन रझा हा काम करत होता. रविवारी सकाळच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी भीमा नदी पात्रात हुसेन रझा हा आला होता. मात्र त्याच ठिकाणी सेल्फी घेत असताना पुलावरून पाय घसरल्यामुळे हुसेन रझा हा नदी पात्रात पडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
पंढरपूर तालुका पोलिसांना भीमा नदी पात्रात गुरसाळे येथे युवक वाहून गेल्याची घटना समजताच, सदर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरसाळे येथे धाव घेतली व सदर वाहून गेलेल्या युवकाचा शोध मोहिमेत सुरुवात करण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती.
0 Comments