अक्कलकोट! पत्र्याच्या अँगल गळफास घेऊन २२ वर्षाच्या तरुणाची आत्महत्या


अक्कलकोट/प्रतिनिधी: 

तालुक्यातील दहिटणे येथील २२ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याची अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. यात चन्नबसव तुकनपा मैत्रे (वय ५९ रा. दहिटणे, ता. अक्कलकोट) यांनी पोलिसात माहिती दिली आहे.

आकाश धोंडप्पा मेत्रे (वय २२, रा. दहिटणे, ता. अक्कलकोट) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मैत्रे याने राहते घरी आत्महत्या केली आहे. याची नोंद अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८) झाली आहे. आकाश मैत्रे याने आत्महत्या का केली हे कारण समजलेले नाही.

राहते घराचे पत्र्याचे अँगला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे, असे चन्नबसव तुकनपा मैत्रे यांनी पोलिसात दिलेल्या माहितीत म्हटले आहे. याचा तपास पोलिस नाईक बिराजदार करत आहेत.

Post a Comment

0 Comments