राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
करूणा मुंडे म्हणाल्या, पंकजाताई, २०२४ च्या निवडणुकीत मी तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या पाठिशी उभं राहणार आहे. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत असं म्हणत करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी देखील भाष्य केले आहे. माझ्या नवऱ्याने मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अजितदादांच्या देखील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.’ असे वक्तव्य करुणा मुंडे यांनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आलेलं आहे.
0 Comments