२४/०९/२०२१ रोजी वैराग नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांना वैराग ग्रामस्थांनाचा वतीने निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे होते की वैराग ग्रामपंचायत नुसार वार्ड क्रं.६ मधील कासार गल्ली ते आझाद चौक या ठिकाणी गटारी प्रचंड तुंबलेल्या त्याचे हुशीत पाणी रस्त्यावर व पाणी पुरवठा वाॅल मध्ये जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असुन मलेरिया डेंग्यू वा सारख्या रोगांचा प्रसार सपाट्याने होत आहे या वाढत्या प्रसारामुळे एखादी व्यक्ती नागरीक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी रोगागामुळे कोणाचा बळी न जावो यासाठी आपण तातडीने लक्ष्य घालून त्वरित वार्ड क्रं ६ मधील गटारी सुच्छ करण्याबाबत संबंधितांस त्वरित आदेश द्यावीत व आमचें गैरसोय दूर करावी ,असे निवेदन दिल्यानंतर वैराग चे मुख्याधिकारी वीणा पवार यांनी दाखल घेत २८/९/२०२१रोजी संबंधितांना त्वरित आदेश देऊन वार्ड क्रं ६ मधील कासार गल्ली ते आझाद चौक या ठिकाणी गटारी सुच्छता करून घेतले आहे.
मुख्याधिकारी विना पवार दिलेल्या शब्दाला जागत नागरिकांची गैरसोय दूर केली त्या बद्दल वैराग नागरिकाकडून वैराग नगरपंचायत मुख्याधिकारी वीणा पवार व कर्मचाऱ्यांची मनापासून आभार मानत आहेत, विना पवार आपल्या कामाची गती पाहता वैराग शहराचा कायापालट होता राहणार यात काडी मात्र शंका नाही आपण अशाप्रकारे गोरगरीब जनतेची प्रश्न सोडत राहावे.
0 Comments