पुन्हा सेना-भाजप युतीचे संकेत, ‘हसत-खेळत’ दिला राष्ट्रवादीला इशारा


महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ताज्या वक्तव्यातून याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पुणे जिल्ह्यात आमचं कुणी ऐकत नाहीत, असं म्हणतात.

आम्ही अजित पवारांना आमचं ऐकायला सांगू, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे संकेत दिले.

(Advertise)

पुणे जिल्ह्यातील भोसरीत घेतलेल्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. पुण्यात आपलं कुणी ऐकत नसेल, तर आपण अजित पवारांना सांगू. अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत, असं म्हणत त्यांनी सभागृहात एकच हशा पिकवला. मात्र त्यानंतर लगेच सारवासारव करत आपल्या म्हणण्याचा पूर्ण अर्थ समजून न घेता लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करू नका, असं वक्तव्य माध्यमांना उद्देशून केलं. 

माझं म्हणणं चुकीचं ऐकू नका, असं राऊतांनी म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, कारण एक दिवस आपल्याला दिल्ली काबीज करायची आहे. महाविकास आघाडी दिल्लीवर राज्य करणार असल्यामुळे पंतप्रधान कुठे बसतात, ते पाहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याचं राऊत म्हणाले.

Post a Comment

0 Comments