बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील भुयारी गटार योजना, रस्त्यांची कामे, पाणी पुरवठा, आगामी गणेशोत्सव व शहरातील वाढत्या चोऱ्या यांबाबत अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीमध्ये बार्शी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. शहरातील ज्या-ज्या भागात हे काम पूर्ण झाले आहे, त्या भागात रस्त्यांची सुरू असलेली कामे याचीही माहिती घेतली. त्याचप्रमाणे जवळपास 70 ते 80 टक्के प्रमाणात भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. काही भागातील रस्त्यांची कामे ही पावसाच्या व्यत्ययामुळे थांबलेली असून परतीच्या पावसानंतर त्या स्त्यांची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. या बाबतही अधिकारी व संबंधित ठेकेदारासोबत सोबत चर्चा झाली.
मागील आठवड्यात बार्शी शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. कारण बार्शी शहरातील अलीपूर रोड येथील पाईपलाईन गळती, तसेच शेंद्री नजीकची पाईपलाईन गळती, म्हैसगाव जवळील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच कंधार व कुर्डूवाडी येथील वीजपुरवठा १५ ते १६ वेळा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठ्यास अडचण निर्माण झाली होती. उजनी पाईपलाइनच्या सततच्या गळतीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
काही दिवसांवर येऊन ठेपलेला सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करून श्रींची गणेश मूर्ती विक्री, पूजा साहित्य विक्री, मिठाई विक्री, स्टॉल, मंडप, स्टेज आदी गोष्टींबाबत चर्चा होऊन याची शहरातील वाहतुकीला अडचण होणार नाही, गर्दी होणार नाही व सामाजिक सलोखा राखत गणेश उत्सव साजरा करण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
त्याचबरोबर मागील काही दिवसांत बार्शी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याला आळा घालण्यासाठी नगरसेवक व पोलिस प्रशासन सर्वांनी मिळून याबाबत जागरूक राहून गल्लोगल्ली एकमेकांच्या सहकार्याने सुरक्षा दल स्थापन करण्याच्या योजनेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरून नागरिकांना पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधीं बाबत विश्वास निर्माण होऊन त्यांच्या मनात कोणतीही भीती राहणार नाही.
त्याचबरोबर बार्शी शहरातील शिवाजीनगर व सुभाष नगर भागातील पोलीस चौकी दुरुस्त करून ती लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. असिफभाई तांबोळी, बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब, पोलिस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे साहेब, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता गफार शेख, महावितरणचे कार्यकारी अभियंता भारती, शाखा अभियंता जी.एस. करळे, खिल्लारी कन्स्ट्रक्शनचे विजयन खिल्लारी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक विलास आप्पा रेणके, पक्षनेते विजय नाना राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेवक भारत पवार सर, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, जलदाय अभियंता अजय होनखांबे, नगर अभियंता भारत विधाते, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
0 Comments