करमाळा! जिंती गावांमधील धक्कादायक घटना; मुलानेच केला वडिलांचा खून


करमाळा/प्रतिनिधी: करमाळा तालुक्यातील जिंती या गावांमध्ये धक्कादायक घटना घडली, एकुलत्या एका मुलाने वेड्याच्या भरात वृद्ध पित्यास बेदम मारहाण केली त्यात वृद्ध पित्याचा मृत्यू झाला आहे. 

जिंती या गावातील रहिवासी राजाराम मारुती जगताप (वय-७५) यांना एकुलता एक अंकुश नावाचा मुलगा आहे. त्याचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. गेल्या काही वर्षापासून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्याला काही दिवस मनोरूग्णालयात दाखल केले होते. पण तो पूर्ण बरा झाला नव्हता. तो दारू पिऊन दिवसभर रेल्वे गेट ते गावात चकरा मारत असे. एक वर्षापासून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे.

 त्याने गुरूवार (ता.२) रात्री दारू पिऊन वेडाच्या भरात वडील बेशुद्ध पडेपर्यंत मारले. आज शुक्रवार सकाळी ही हकिकत येथील जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांना समजताच त्यांनी राजाराम जगताप यांना वाहन करून उपचारासाठी करमाळा येथे पाठविले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. करमाळा पोलीसांना ही हकीकत समताच तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील कुटीर रूग्णालयात पाठविला आहे.

Post a Comment

0 Comments