टेंभुर्णी येथे अज्ञात टोळीने लुटला सिगरेटचा टेम्पो, एक कोटी रुपयांचा मुद्देमालाची केलेली लूट


माढा/प्रतिनिधी:

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथे एक कोटी रुपये किमतीच्या सिगरेटचे बॉक्स असणारा टेम्पो सहा ते सात जणांच्या अज्ञात टोळक्याने लोखंडी सळई च्या मदतीने लुटल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये टेम्पो चालक व त्याच्या जोडीदारास लोखंडी सळईने मारहाण करून अडीचशे बॉक्स लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात टोळी विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली आहे. 
(Advertise)

एक कोटी रुपयांची सिगरेटचा टेम्पो लुटला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो चालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय ३८, रा. बंजाराहिल्स, रोड नंबर १०, गुरूब्रम्हानगर, हैद्राबाद, तेलंगणा) हा २१ रोजी आयशर टेम्पो मोहम्मद इस्माईल या जोडीदारासह चारमिनार कंपनीचे चार मिनार सिगारेट कंपनीचे ९९ लाख ३७  हजार १७५.५ किंमतीचे सिगारेटचे २५० बॉक्स घेऊन पुण्याच्या दिशेने जात होते.

(Advertise)

टेंभुर्णी पोलीस ठाण्यात टोळी विरोधात गुन्हा दाखल
 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे आला असता सिगरेट बॉक्स असणारा टेम्पो साधारण २ ते ३ किमी अंतरावर अनोळखी ६ ते ७ अज्ञात चोरट्यांनी पाठलाग केला. त्यानंतर टेम्पो थांबून टेम्पोमधील चालक व त्याच्या जोडीदार शिवीगाळ करीत दमदाटी देत व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आयशर टेम्पो मध्ये अडीचशे सिगरेटच्या बॉक्स टोळक्याने लुटून नेली साधारण एक कोटीच्या आसपास सिगरेट बॉक्स लुटून नेल्याचा प्रकार घडला याप्रकरणी अज्ञात टोळी विरोधात कलम ३९५ नुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर करत आहे.

 

Post a Comment

0 Comments