मुंबई:
भाजप नेते आणि माजी मंत्री आत्मराम तोमर यांची टॉवेलने गळा दाबून हत्या झालीय. तोमर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांमध्येही खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची आता चौकशी केली जात आहे, लवकरच कारण समोर येईल, असं पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तोमर यांचा ड्रायव्हर विजय आज सकाळी जेव्हा तोमर यांच्या घरी पोहोचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि कार जागेवर नव्हती. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर बेडवर तोमर यांचा मृतदेह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता.
0 Comments