बार्शी तालुका डिजिटल मीडिया बैठकीचे आयोजन...


डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य

सस्नेह नमस्कार🙏

विषय :- डिजिटल मीडिया संघटनेची आढावा बैठक व नविन सदस्य नोंदणी बाबत

महोदय,

           वरील विषयास अनुसरून डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते कि, बार्शी तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व युट्युब चॅनल, पोर्टल, पेज व अन्य माध्यमातून डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या संपादक, पत्रकार, प्रतिनिधी यांची, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची नविन सदस्य नोंदणी आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, सर्वांना न्याय व हक्क मिळण्यासाठी आणि डिजिटल मीडियाला एक दिशा देण्यासाठी, डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्वांना सोबत घेऊन, संबंध महाराष्ट्रभर संघटन मजबूत करण्याचे कार्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ संपादक "राजा माने" यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बार्शी तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्व सदस्यांची नविन सदस्य नोंदणी आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सर्वांनी सदरील बैठकीसाठी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती. नविन सदस्य नोंदणीसाठी येताना आपले आधारकार्ड झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो आणावा.
तसेच तालुका कार्यकारिणी आणि जुन्या सदस्यांनी बैठकीसाठी उपस्थित रहाणे बंधनकारक राहील.

टीप :- बैठक नियोजित वेळेवर चालू होईल.

ठिकाण :- लक्ष्य इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटर,तलाठी कार्यालयासमोर,अलीपूर रोड,बार्शी.
कालावधी :- वार गुरुवार,दि.23/09/2021
वेळ :- दुपारी ठीक 12:45 वा.

निमंत्रक :-

अजय पाटील - तालुका अध्यक्ष
इर्शाद शेख - तालुका उपाध्यक्ष
दिनेश मेटकरी - तालुका सचिव

धन्यवाद !

Post a Comment

0 Comments