अभिनेत्री कंगना राणावत ने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचले


अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या ‘थलायवी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटाला तमिळ आणि तेलगू भाषांसाठी चित्रपटगृहं मिळाली. पण, हिंदीसाठी कोणतंही चित्रपटगृह न मिळाल्याने कंगनाने संताप व्यक्त केला. यावरून तिने थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला . आपल्या पोस्टमध्ये जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असे म्हणत त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली .

(Advertise)

तत्पूर्वी कंगनाने याअगोदरही शिवसेनेसोबत पंगा घेतलेला आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही ती सतत टीका करीत असते . कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की , ठाकरे सरकार चित्रपटगृहं संस्कृती पूर्णपणे नष्ट होईपर्यंत चित्रपटगृहं बंदच ठेवेल . चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी अनेक चित्रपट आहेत .मात्र अद्यापही कलाकार, निर्माते, वितरक आणि थिएटर ऑपरेटर्सची चिंता नाही. राज्य सरकारचा चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचा असमान दृष्टिकोन यातून स्पष्टपणे दिसून येतो. इतकेच नाही तर चित्रपट सृष्टीनेही यावर चुप्पी साधली आहे . पण कोणीही जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकत नाही,असा टोला कंगनाने लगावला आहे . दरम्यान कंगनाचा ‘थलायवी’ हा लवकरच हिंदीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments