सांगोला तालुक्यात अवैधरित्या वाळू तस्करी, ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


सांगोला/प्रतिनिधी:

सांगोला तालुक्यातील कोंबडवाडी ओढ्याजवळ जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना वाळूचा उपसा करताना चार वाळू तस्करांवर कारवाई केली आहे. कारवाईमध्ये ३० लाख रुपयांच्या तीन टीपरसह २० लाख रुपये किमतीचा जेसीबी असा सुमारे ५० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगोला ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली आहे.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोंबडवाडी ओढ्याजवळ जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना वाळूचा उपसा करताना संभाजी आनंदा माने (रा. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली), दऱ्याप्पा विठ्ठल माळी (रा. आंधळगाव), राजाराम हुमान्ना येड्डे (रा. भालेवाडी, ता. मंगळवेढा) व सुखदेव निवृत्ती कोळेकर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

तीन टिपर सह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त

कोंबडवाडी ओढ्याजवळ चालक-मालक जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना ६० हजारांची ६ ब्रास वाळू टिप्परमध्ये भरून सांगलीला घेऊन जाण्याच्या तयारीत होते. त्याच ठिकाणी पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या पथकाने छापा टाकला.

कारवाईमध्ये ३० लाख रुपयांच्या तीन टीपरसह २० लाख रुपये किमतीचा जेसीबी असा सुमारे ५० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments