बार्शी/प्रतिनिधी:
आज बँक ऑफ महाष्ट्रमधील सर्व कर्मचारी संघटनेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी संपावर होते. प्रामुख्याने प्रत्येक श्रेणीतील नोकरभरती हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. गेल्या अनेक वर्षापासून बँकेनी निवृती, मृत्यू , बढती या कारणांनी रिकाम्या झालेल्या जागा भरल्या नाहीत उलटपक्षी बँकेच्या अनेक नवीन शाखा उघडल्या, व्यवसाय वाढला, सरकारच्या विविध योजनांची अंमबजावणी ही तुटपुंज्या कर्मचाऱ्यावर चालू आहे. परिणामी आहे तो कर्मचारी पीचतो आहे शिवाय त्याचा ग्राहकांना फटका बसतो आहे.
आज १२७१ शाखामध्ये सफाई कर्मचारी नाही तर ६९७ शाखामध्ये शिपाई नाही तर ५५ शाखा या क्लार्क नसलेल्या आहेत. इतकी भयानक आवस्था असताना व्यवस्थापन या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे म्हणून आजचा संप आहे.
यावर व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतली तर ठीक अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती संघटनेच्या महिला प्रतिनिधी कॉम्रेड सरिता कुलकर्णी यांनी दिली. बार्शी शहरातील कर्मचारी बार्शी मुख्य शाखा व शिवाजीनगर शाखेसमोर परिस्थितीचे आकलन करणारे पत्रक घेऊन उभे होते.
0 Comments