"एक जरी दगड मारला तरी महागात पडेल" : चंद्रकांत पाटील


पुणे:

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तरे द्या आणि कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोपे आहे. मात्र, ‘ईडी’ला सामोेरे जाताना तोंडाला फेस येईल.

सोमय्या यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी एक जरी दगड मारला तर महागात पडेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना सोमवारी दिला.

(Advertise)

सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये ज्या कंपन्यांतून आले, त्या कंपन्या कोठे आहेत आणि कोलकात्याच्या कंपन्यांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक कशी केली, यावर मुश्रीफ यांनी बोलावे. सोमय्या यांनी केलेल्या पहिल्या आरोपावर मुश्रीफ यांनी अजून उत्तर दिलेले नाही.

Post a Comment

0 Comments