महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ भाजप आमदाराचा प्रताप


पुण्यातील एका भाजप आमदाराची आॅडिओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या आॅडियओ क्लिपमध्ये भाजप आमदारानं एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. या आॅडिओ क्लिपनं सध्या एकच खळबळ माजवली आहे.

भाजपाच्या आमदार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या क्लिपमध्ये भाजप आमदार अतिशय गलिच्छ भाषेत बोलताना ऐकू येत आहे. ही क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पुणे महापालिकेतील कामाच्या लॉकिंग बिलासंदर्भात आमदारांनी महिला अधिकाऱ्याला फोन केला होता. बिलं काढता की नाही, काय करता ते सांगा? नाहीतर तुमच्याकडे बघून घेतो, असं म्हणत महिला अधिकाऱ्याला आमदारांनी धमकाविण्याचा प्रयत्न केला आहे. 

(Advertise)

दरम्यान, यावर महिला अधिकारी तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, असं सांगतात. त्यावर मी काय तुमचा नोकर आहे का?, तुम्ही तुमच्या साहेबाला फोन करा, आणि मला परत १० मिनिटांत फोन करा, असं आमदारांनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments