आरोग्यमंत्र्यांनी हस्ते बार्शीतील 'कोठारी लॅब'चा विशेष सन्मान



बार्शी/प्रतिनिधी:

 बार्शीसारख्या ग्रामीण भागातून गेल्या ३८ वर्षांपासून लॅबोरटरीच्या माध्यमातून रुग्णसेवा देणाऱ्या कोठारी लॅबचा सन्मान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते करण्यात आला. कोठारी लॅबोरेटरीजचे संचालक आदित्य कोठारी यांनी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधील शानदार सोहळ्यात हा पुरस्कार स्विकारला. ग्रामीण भागातील रोगनिदानात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, ग्रामीण भागातील डायग्नोस्टीक कॅटेगिरीत हा पुरस्कार कोठारी लॅबला मिळाल्याने राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात बार्शीचं महत्त्व आणखी अधोरेखित झालं आहे. 
(Advertise)

सन १९८३ साली बार्शीतील कोठारी लॅबोरेटरीजची स्थापना करण्यात आली. डॉ. अशोक कोठारी यांनी ग्रामीण भागात पहिली स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब सुरू करुन बार्शीसह आजुबाजूच्या तालुक्यातील रुग्णांची मोठी अडचण दूर केली. डॉ. कोठारी यांच्या प्रयत्नामुळे महानगरांमधील खर्चिक आणि गावापासून कोसो दूर असलेलं अंतर कमी होऊन बार्शीतच किफायतशीर दरात गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा सुरू झाली, आता वडिलांचा तोच वारसा लॅबचे संचालक आदित्य कोठारी पुढे चालवत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे व्रत ते आपल्या कामातून जपत आहेत. 

(Advertise)

कोठारी लॅबच्याच्या कार्याचं एक उल्लेखनीय वैशिष्ट म्हणजे, बार्शीत गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेला 'महावीर धर्मार्थ दवाखाना'मधील गरीब व गरजू रुग्णांची अत्यल्प दरात तपासणी येथे होत आहे. तसेच, लॅबच्यावतीने दरवर्षी रोटरी, लायन्सच्या माध्यमातून अल्पदरात रक्त तपासणी शिबीर, विविध तपासणीचंही काम केलं जातं. कोरोना महामारीच्या संकटातही कोठारी लॅब आणि टीमने सामाजिक बांधिलकी आणि रुग्णसेवेचा वसा जपलाय. त्यामुळेच, कोठारी लॅबचा आणि बार्शीचा सन्मान झी २४ तासच्यावतीने करण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी, राजेश टोपेंनीही आदित्य कोठारीचं आणि लॅबच्या कार्याचं विशेष कौतुक केलं.

Post a Comment

0 Comments