सामंथा सोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर नागा चैतन्यकडून वक्तव्य, म्हणाला...



 दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य  यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. नागा चैतन्य आजकाल त्याच्या बॉलिवूड डेब्यू फिल्म लाल सिंह चड्ढामुळे चर्चेत आहे. साऊथचा स्टार नागा चैतन्यने पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मीडिया पोर्टलवर आपलं वक्तव्य केलं आहे.

जेव्हा नागा चैतन्यला मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाइफबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेता म्हणाला, "मला वाटते की, मी माझ्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर हे समजले आहे. मी माझे वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाइफ कधीही एकत्र आणत नाही. 

त्यानंतर देखील, जेव्हा नागा चैतन्यला मीडियाकडून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेता म्हणाला, 'सुरुवातीला मी खूप अस्वस्थ असायचो. मला असे वाटायचे की, काय हे एन्टरटेन्मेंट आहे का? परंतु नंतर मला हे कळून चूकले की, आजच्या काळात बातम्या फक्त बातम्याच बदलतात. आज जी बातमी आहे ती उद्या नसेल. उद्या आणखी काही बातम्या येतील. आजच्या बातम्या विसरल्या जातील." आज बातमी दुसऱ्या सेकंदाला बदलते. लोकांना आधीच्या बातम्यांबद्दल आठवत देखील नाही. आज बातम्या फक्त टीआरपी वाढवण्यासाठी केल्या जातात. मला हे जाणवल्यापासून मी या गोष्टींची पर्वा करत नाही."

यापेक्षा जास्त काही न बोलता अभिनेता एवढ्यावरती थांबला. परंतु त्याने या मुलाखतीत देखील त्याच्या आणि सामंथाच्या नात्याबद्दल उघड काहीच सांगितले नाही. उलट त्याने मीडियालाच विचार करायला भाग पाडले आहे.

Post a Comment

0 Comments