कोल्हापूर! कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रास ५ हजार प्यारासिटमॉल औषध साठा भेट



कोतोली/प्रतिनिधी:

 कोविड १९ लसीकरणसाठी आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याने आनंदी फाऊंडेशन कोतोली यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास ५ हजार प्यारासिटामॉल औषधांच्या गोळ्या माजी डे. सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सज्जन पाटील दाजी यांच्या शुभ हस्ते आज वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

 या प्रसंगी एस डी पाटील सर (उपाध्यक्ष को.जी.मा.शी.) माजी डे. सरपंच सरदार पाटील, अरुण पाटील,(क्रीडा अधिकारी) अविनाश कोतोलीकर (जिल्हा अध्यक्ष लोक भारती पक्ष) संतोष पोवार,(सेक्रेटरी,आनंदी फाउंडेशन), संतोष सुर्यवंशी, संदीप चौगले , रविंद्र सावत, परिचारिका गाडगीळ मॅडम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments