बार्शी/प्रतिनिधी:
पांगरी पोलीस ठाणे गु.र.नं. २५०/२०१७ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हातील आरोपी वसंत बाबु मांजरे रा देवगाव (मां) ता बार्शी जि सोलापुर यांने दि ०२/१०/२०१७ रोजी भालेराव वस्तीजवळ देवगाव येथे धर्मराज विठ्ठल मांजरे, रा. देवगाव (मां), ता. बार्शी, जि. सोलापुर यांना आरोपी यांने टॉवेलमध्ये दगड बांधुन डोक्यात मारून जखमी करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिले व उपचारादरम्यान धर्मराज विठ्ठल मांजरे हे मयत झाले.
त्यादिवसापासुन वसंत बाबु मांजरे हा पुणे, आळंदी, जेजुरी, सातारा या ठिकाणी राहुण वेश बदलुन पोलीसांना गुंगारा देत होता. आज रोजी सपोनि शिवाजी जायपत्रे यांना वसंत बाबु मांजरे हा आरोपी लोणंद, ता. खंडाळा, जि.
सातारा येथे असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील एक पथक आरोपीचा शोध घेणेकामी रवाना करुन लोणंद गावच्या शेजारी पाडळी गावच्या शिवारात, महादेव नगर येथे पथकाने आरोपी यास ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयातील पाच वर्षापासुन फरार असलेला आरोपी वसंत बाबु मांजरे, रा. देवगाव (मां), ता. बार्शी यास पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. जायपत्रे, यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना./१६६७ अमोल माने, पो.ना./१६३२ अभय उंदरे, पो.शि.
|२१३२ धनराज फत्तेपुरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पो.शि./११८२ रतन जाधव यांनी महत्त्वाचे कार्य
केले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता पांगरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे
0 Comments