सोलापूर/प्रतिनिधी:
लग्न करण्याचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची घटना जोडभावीपेठ परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक खंडू सर्वगोड (वय१९ रा. नंदूर ता. दक्षिण सोलापूर) याला अटक करून त्याच्या विरुद्ध बलात्कार आणि बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला.
त्या अल्पवयीन तरुणीला अभिषेक सर्वगोड याने लग्न करतो असे सांगून अत्याचार केला, अशा आशयाची फिर्याद जोडभावीपेठ पोलिसात दाखल झाली. आरोपीला रविवारी अटक करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी हे पुढील तपास करीत आहेत .
0 Comments