सेलिब्रिटीचे निधन फक्त एक तमाशा”; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत


बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ४०व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्माने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिने या पोस्टमध्ये ‘सेलिब्रिटीचे निधन फक्त तमाशाच असतो’ असे म्हटले आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला स्टँड अप कॉमेडियन आणि यूट्यूबर झाकीर खानची पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये, ‘ते तुम्हाला (सेलिब्रिटींना) माणूस मानत नाहीत. त्यामुळे कोणत्याही मर्यादा नाहीत. तुमचा मृतदेह हा त्यांच्यासाठी एक आत्मा नसलेले शरीर आहे. त्यांच्यासाठी केवळ फोटो काढण्याची एक शेवटची संधी’ असे तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले असल्याचे दिसत आहे.

झाकीर खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ते तुम्हाला माणूस मानत नाहीत. त्यामुळे कोणत्याही मर्यादा नाहीत. तुमचा मृतदेह हा त्यांच्यासाठी एक आत्मा नसलेले शरीर आहे. केवळ फोटो काढण्याची एक शेवटची संधी.. हे असे आहे की दंगली होत असताना एखाद्या आग लागलेल्या घरातून भांडी चोरणे… कारण त्यानंतर तुमचा काही उपयोग नसतो…

जास्तीत जास्त १० फोटो, ५ बातम्या, ३ व्हिडीओ, २ स्टोरी, १ पोस्ट आणि संपलं.. त्यामुळे तुमचे निधन फक्त एक तमाशा बनून राहतो… रडणारी आई देखील तमाशा, बेशुद्ध बहिण, हतबल झालेला भाऊ, तुमच्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती एक तमाशा बनते’ या आशयाची पोस्ट केली आहे.

Post a Comment

0 Comments