गुळपोळी येथील पुल दुरुस्त न केल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा ; नेहरू युवती मंडळाच्या अध्यक्षा रेखा चिकणे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील सुर्डी श्रीपत पिंपरी मार्गावरील ओढ्यावरील पुलाचे काम दोन वर्षापासून रकडले आहे. हा पूल धोकादायक बनला असून प्रवाशांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लक्ष्य घालून तातडीने चालू करावे असी मागणी येथील नेहरू युवती मंडळाच्या अध्यक्षा रेखा चिकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे.

हा पुल दुरुस्त न केल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी या पुलावरुन पाणी वाहत होते त्यामुळे सुर्डी श्रीपतपिंपरी हा मार्ग बंद झाला होता. याबाबत अधिक माहिती अशी की सुर्डी ते श्रीपतपिंपरी हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी वर्ग केलेला आहे. 

अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर व बार्शी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे गेला आहे. गुळपोळी येथील गावानजीकच्या ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून मंजूर असून काही तांत्रिक कारणावरून पुलाचे काम बंद झाले. तरी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर व उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बार्शी यांनी पुलाचे काम लवकरात लवकर करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. गेल्या वर्षी शेतात कामावर जाणाऱ्या दोन महिला या ओढयात वाहून गेल्या होत्या परंतु काहींनी त्यांचा जीव वाचवला त्याचदिवशी तीन जनावरे वाहून गेली त्यापैकी एक गाय बेपत्ता झाली व दोन म्हसी मालवंडीच्या शिवारात वाचविण्यात यश आले. या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील गुळपोळी गावच्या ओढ्यावरील पुलाचे काम त्वरित करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments