बार्शी/प्रतिनिधी:
देशी विदेशी दारूच्या बाटल्याची बार्शी विनापरवाना वाहतूक रिक्षातून करत असताना बार्शी शहर पोलिसांनी धाड टाकून पोलिसांनी ३० हजारांची दारू जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलीस नाईक शिवाजी बळिराम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वैभव चंद्रकांत पिसे व रिक्षाचालक अनिल रामचंद्र दबडे (४३़, रा. नाळे प्लॉट) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक परवाना नसताना त्याने वाऊन शॉपमधून देशी विदेशी दारुच्या बाटल्या भरलेले बॉक्स रिक्षा (एम.एच. १३ / बी. व्ही. ०८५५) यात भरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ती रिक्षा अडवून तपासणी करता देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळले. या बॉक्समधून २१७ बाटल्या जप्त केल्या. अधिक तपास फौजदार ज्ञानेश्वर उदार करत आहेत.
0 Comments