नागपूर : प्रदीप जनार्धन बागडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. प्रदीपची हत्या त्याच्याच पत्नीने सुपारी देऊन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खापा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मृतक प्रदीप हा नेहमी बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ज्यामुळे त्यांचे वैवाहिक संबंध ताणले गले होते. रोज-रोजच्या भांडणाच्या कटकटीला कंटाळून सीमाने तिचा परिचय असलेल्या पवनला तीन लाखांची सुपारी दिली होती, असा कबुली जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे.
मृतक प्रदीप बागडे आणि त्याची पत्नी सीमा यांच्यात रोज भांडण होत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून सीमाने नवऱ्याला मारण्यासाठी पवनला तीन लाखांची सुपारी दिली. सौदा पक्का झाल्यानंतर ५० हजार रूपये ऍडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. काम झाल्यानंतर उर्वरित अडीच लाख रुपये देण्याचे सीमाने कबूल केले होते. सीमा आणि पवनने संगनमत करून प्लॅन तयार केला. पवनने प्रदीपचे अपहरण करून वरुडला नेले. तिथे प्रदीपची हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकडानाला परिसरातील जंगलात फेकून दिला होता.
0 Comments