अक्षय कुमारचा तो फोटो पाहून आयपीएस अधिकारी नाराज, म्हणाले


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यभर चित्रपटगृह सुरू करण्याची घोषणा केली आहे.  चित्रपट निर्माते रोहित शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर, अक्षय कुमारने  त्याच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाबद्दल एक ट्विट केलं, जे पाहून छत्तीसगडचे विशेष डीजीपी आर के विज थोडे ‘चिडले’. मात्र खिलाडी कुमारने लवकरच IPS ची नाराजी दूर केली.

वास्तविक, अक्षय कुमारने एक ट्विट केलं. त्याने लिहिले, ‘आज अनेक कुटुंबे उद्धव ठाकरे यांचे आभार मानतील! 
या ट्विटसह त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहेत. फोटोत स्पष्ट दिसत आहे की इन्स्पेक्टरची भूमिका करणारा रणवीर सिंह टेबलवर बसलेला आहे, तर अक्षय कुमार आणि अजय देवगण, जे वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत, मात्र ते दोघंही उभे आहेत.

हा फोटो पाहून डीजीपी आरके विज यांनी अक्षय कुमारचे हे ट्विट रिट्विट केले आणि एका कमेंटमध्ये लिहिले- ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब उभे आहेत, ऐसी नहीं होता है जनाब.’

Post a Comment

0 Comments