अभिनेता शाहरूख खानच्या भारतीय चाहत्यांनी शाहरुखचा अभिनयाला उत्तम कोटीचा दर्जा दिला आहे. शाहरुख खान हा त्यांच्या गळ्यातील ताईत असून चाहत्यांनी त्याला अभिनय क्षेत्रात सर्वोच्च स्थानी मानलं आहे. परंतु शाहरुख खान या येनकेनप्रकारेन वादळी चर्चेत नेहमीच असतो.सध्या मात्र याच शाहरुख खानबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्याची कोणी अपेक्षाही केली नसावी.
काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं देश काबीज करत सत्ता स्थापन केली. यावेळी पाकिस्तानकडून तालिबानच्या कृत्याला दुजोरा देण्यात आला होता. इतकंच नव्हे तर, तालिबानचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी पाकिस्तानातूनच मदत केली जात होती, असा दावाही काहींनी केला. ज्यामुळं अनेक राष्ट्रांच्या नकारात्मक यादीत पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाव गिरवलं गेलं.
(Advertise)
अशातच इथं भारतात अभिनेता शाहरुख खान याच्या नावाच्या चर्चांना उधाण आलं. पण, हे उधाण होतं शाहरुखच्या चित्रपटांसह अभिनय विश्वातच त्याच्यावर बंदी घालण्याचं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि शाहरुख यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्याचं पाकिस्तान कनेक्शन जोडत अफगाणिस्तान मुद्द्यावरुन शाहरुखला निशाण्यावर घेण्यात आलं आहे. कधीकाळचा फोटो शोधत त्यावरुन होणाऱ्या या विरोधाची शाहरुखला काय, त्याच्या चाहत्यांनाही अपेक्षा नसावी.
तालिबानला मदत करण्याचं इम्रान खान यांचं आवाहन हल्लीच माध्यमांशी संवाद साधताना तालिबानला मदत करा, असं आवाहन इम्रान खान यांनी केलं होतं. साऱ्या जगानं मदत गेल्यास तालिबान एका नव्या दिशेनं वाटचाल करु शकेल. इम्रान खान यांचं हे वक्तव्य साऱ्या जगालाच हादरा देणारं होतं.
0 Comments