महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या
गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट ‘क’साठी एकूण २७४० एवढय़ा जागा आपण भरत आहोत. गट ‘ड’साठी ३ हजार ५०० जागा आपण भरत आहोत. एकूण जवळपास ६ हजार २०० जागा आपण भरत आहोत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्जदेखील आले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, २५ आणि २६ रोजी होणाऱया या परीक्षेसाठी माझी सर्व परीक्षार्थ्यांना विनंती आहे. आपले परीक्षा केंद्र लक्षात ठेवा. परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पूर्णपणे पालन केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार, त्यामुळे परीक्षा केंद्रावर कुठलेही इलेक्ट्रिकल गॅझेट चालणार नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. राज्यभरातील पोलीस आयुक्त, जिल्हाधिकाऱयांना सूचित केले असून त्यांनी आपल्या विभागातून उपजिल्हाधिकारी व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा पेंद्रांवर सतत पेट्रोलिंग करून परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडाव्यात.
0 Comments