संत बाळूमामाचा अवतार असून दिव्यशक्ती आपल्याकडे असल्याचं सांगत लोकांना फसवणारा भोंदूबाबा मनोहर भोसलेला आता गजाआड गेला आहे. गजाआड जातात तो त्याची सर्व दिव्यशक्ती विसरला वाटतं, कारण मला आता जेलमध्येच मरूद्या, असं मनोहर भोसले म्हणत आहे. यांसदर्भात माहिती तपास अधिकारी आणि पोलीस निरिक्षक महेश ढवाण यांनी सांगितलं आहे.
मी बदनाम झालो असून मला जेलमधून सोडू नका, माझा शेवट जेलमध्येच करा कारण मला आता जगायचं नाही, असं म्हणत मनोहर भासले उर्फ मामाने अटकेनंतर आपल्या भावना मांडल्या. ज्या लोकांना आपण ओळखत नाही त्यांनी आपल्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत.
मनोहर भोसलेला अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायाधीश डी. एन गिऱ्हे यांनी मनोहर भोसलेला १६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचं पोलीस अधिकारी ढवाण यांनी सांगितलं.
0 Comments