भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा धक्का दिलाय. गोपीनाथराव मुंडे आणि पंडितअण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी, तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह ५ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं पंकजा मुंडे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
0 Comments