मधुबन नर्सरी व लायन्स क्लब यांच्यातर्फे सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान या विषयावर बार्शी मध्ये, भव्य शेतकरी मेळावा सर्वांसाठी मोफत


बार्शी/प्रतिनिधी: 

येथील मधुबन फार्म & नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी बार्शी येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही. बार्शी येथे परंडा बायपास चौकात सीताफळ किंग डॉ. नवनाथ कसपटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या मधुबन फार्म & नर्सरीच्या परिक्षेत्रात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे ‘भव्य शेतकरी मेळावा’ आणि ‘सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. 

(Advertise)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे या मेळाव्यात अॅनलाईन सहभागी होणार असून, विद्यापीठाचे कृषी विस्तार, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. संजय पांडुरंग पांढरे हे या चर्चासत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नवनाथ कसपटे कीड-रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

(Advertise)

या मेळाव्यात ४२ सीताफळ वाणांची प्रक्षेत्रावरील लागवड तसेच सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत. तसेच चर्चासत्रात सीताफळ लागवडीसंदर्भात पूर्वमशागत व पूर्व नियोजन, योग्य जातीची निवड, रोपांची योग्य लागवड पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, सीताफळ विक्री व्यवस्थापन या विषयांवर उपस्थित सीताफळ उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.मेळावा व चर्चासत्रासाठी कसलीही फी आकारण्यात आलेली नसून, यावेळी सोशल डिस्टंन्सींग व मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असल्याने आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. आगावू नोंदणीसाठी ९९२३१३७७५७ किंवा ९८८१४२६९७४ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन रवींद्र कसपटे व प्रविण कसपटे यांनी केले आहे. तर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अजित देशमुख व पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments