बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील मौजे श्रीपत पिंपरी येथील पिंगळे वस्ती वरील शेतातील उडीत काढून बैलगाडी मध्ये ताडपत्री टाकून ठेवलेला उडीद कोणीतरी चोरून नेला.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत हंबीरराव पिंगळे वय वर्ष ४५ राहणार पिंगळे वस्ती, श्रीपत पिंपरी तालुका बार्शी ,हे बाळासाहेब ताकभाते राहणार माढा यांची गेल्या ३५ वर्षांपासून दहा एकर जमीन बट ई ने करत आहेत. त्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चंद्रकांत पिंगळे यांनी सव्वा एकरात उडीत केला होता . तो उडीद मळणी केल्यानंतर सुमारे सहा कट्टे उडीद त्यांनी बैलगाडी मध्ये रोड लगत असलेल्या पिंगळे वस्ती येथे ताडपत्री ने झाकून बैलगाडी मध्ये ठेवला होता, तो अज्ञात इसमाने चोरून नेल्याची दिसून आले.
सदर विषयात सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना व घरी चौकशी केली असता, चंद्रकांत पिंगळे यांना खात्री झाली की ,उडीत कोणीतरी चोरून नेला आहे .त्यासोबत त्यावर झाकलेली ताडपत्री देखील चोरीला गेलेले आहे.चोरीस गेलेल्या उडीदाचे पोत्यांचे व ताडपत्रीचे वर्णन पुढीलप्रमाणे -१ ) २०,००० / – रु . त्यात अंदाजे ०४ क्विंटल वजनाची उडीदाची एकुण ०६ पोती किं.अं .2 ) १,००० / -रु . त्यात दोन काळ्या रंगाच्या ताडपत्र्या किं.अं .२१,००० / – रु .इतकी होती.
0 Comments