"राज्यपाल कोश्यारींचे भवन हा राजकीय अड्डा"



राजभवन हे भाजपचे कार्यालयच असल्याची टीका यापूर्वीही करण्यात आल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल व भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीवरून राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भवन आता तर राजकीय अड्डाच झालेला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालाय. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशी माहिती मिळाली आहे. मात्र, वारंवार कार्यकर्ते भेटत आहेत. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी भाजपचे असल्याचे दिसत असल्याचे मलिक यांनी म्हंटले आहे.

राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचं दुमत नाही, असे मलिक यांनी राज्यपालांवर टीका करताना म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments