अक्कलकोट! पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; आईच्या फिर्यादीवरून सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल


अक्कलकोट/प्रतिनिधी : 

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली असल्याचा प्रकार तालुक्यातील बादोला बु येथे घडला आहे. याप्रकरणात सासूने सुनेसह दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

त्यावरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध शनिवारी (ता. ११) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. शंकर बसवराज बिराजदार, तानाजी दिगंबर सोलंकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत. याशिवाय यात एका महिलेचा समावेश आहे.

बदोला बु येथे ६ तारखेला राहत्या घरात राम महिपती सोलंकर (वय ३२) यांनी आत्महत्या केली. त्यात शनिवारी (ता. ११) रात्री बारा वाजताच्या सुमारास त्यांच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. गावातील शंकर बसवराज बिराजदार व तानाजी दिगंबर सोलंकर यांच्यासोबत सुनेचे अनैतिक संबंध आहेत. त्याच्याशी अनैतिक संबंध करून मुलासोबत नेहमी भांडण करीत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलगा राम महिपती सोलंकर याने ६ तारखेला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास राहते घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments