भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केल्याचे दिसून येते. काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली अशी टीका पडळकरांनी केली आहे.
मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना परंपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी काका- पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ जमीन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
पूर्वीच्या काळात देवस्थानच्या सेवांसाठी काम करणाऱ्या पुजाऱ्यांच्या नावे राजे-महाराजांकडून इनाम म्हणून जमिनी दिल्या जात होत्या. त्या जमिनी या देवस्थानच्या मालकीच्याच असून, त्या जमिनीवर संबंधित देवस्थानचीच मालक म्हणून नोंद होईल. इनाम म्हणून जमिनीवर वहिवाट करीत असल्यास त्यांना विक्रीचे अधिकार नाहीत तसेच त्यावर मालकी हक्क दाखविता येणार नाही. देवस्थानची सेवा करीत नसलेल्या पुजाऱ्यांकडून ही जमीन काढून घेतली जाईल, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
0 Comments