बलात्कारासारख्या विकृत गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, देहदंड देण्यात यावा वगैरे गोष्टी नेहमी चर्चिल्या जातात. पण बलात्काराचा बदला दुसऱ्या बलात्कारानेच घेण्याची विकृतीची पुढची पायरी समोर आली आहे. आपल्या बहिणीवर बलात्कार कराणाऱ्या नराधमाचा बदला घेण्यासाठी तिचे सख्खे भाऊच नराधम बनले आणि त्यांनी गुन्हेगाराच्या बहिणीबरोबर तसेच अत्याचार केले. ही सुन्न करणारी घटना घडली आहे मध्य प्रदेशात.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत, उलट वाढतच आहेत. बलात्काऱ्यांना कडक शिक्षा मिळायला हवी असं वाटणं ठीक, पण यासाठी पुन्हा एका तोच गुन्हा करायचा? पीडित स्त्रीला न्याय देण्यासाठी दुसऱ्या एका निरागस स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं हा कुठला न्याय? अशीच एक बलात्काराची भयावह घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे.
ज्यात आपल्या सख्या बहिणीवर झालेल्या बलात्कारानंतर तिच्या भावांनी आरोपीच्या बहिणीवर बलात्कार केला आहे, या धक्कादायक घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ज्या दोन भावांनी बलात्कार केला आहे त्यांच्या बहिणीवर पिडीतेच्या भावाने ७ महिन्यांपूर्वी अत्याचार केले होते.
त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी बलात्कार करून सूड काढला आहे. ही घटना मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील आहे. जेव्हा पीडित मुलगी आपल्या घरात एकटी असताना दोन भावांनी घरात प्रवेश करून तिच्यावर अतिप्रसंग केला आहे.
पीडित तरूणीने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की माझ्या घरात मी एकटी असताना दोन सख्या भावांनी माझ्यावर खून करण्याची धमकी देत बलात्कार केला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीसांनी पॉक्सो अॅक्टनुसार त्या दोन भावांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा बलात्कार सूडापोटी करण्यात आला असून पिडीतेचा भाऊ अजूनही जेलमध्ये आहे.
त्यामुळे त्याने केलेल्या अपराधाचा बदला घेण्यासाठी हा बलात्कार करण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली असून अजून एकही आरोपी पोलीसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे लोकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेवर पोलिस लक्ष ठेऊन आहेत, पिडीतेची मेडिकल टेस्ट करण्यात आली असून त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकू अशी माहिती एसपी शिवकुमार वर्मा यांनी दिली आहे.
0 Comments