बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी, करमाळा, परांडा, भूम, वाशी, या सध्याच्या तालुक्यांसह वैराग , टेंभुर्णी , जेऊर , पाथ्रुड , येरमाळा या नवीन तालुक्यांची निर्मिती करून या सर्वांचे जिल्हा मुख्यालय म्हणून बार्शी तालुका असे करावे यासाठी बार्शी जिल्हा निर्मिती कृती समिती स्थापन करण्यात येणार असून वैराग , टेंभुर्णी, जेऊर, पाथ्रुड, येरमाळा यांच्यासाठी स्वतंत्रपणे नवीन तालुका निर्मिती कृती समिती स्थापन करून एकत्रितपणे याबाबत आग्रही भूमिका मांडणीसाठी लोकाग्रह उभारणे आवश्यक आहे. भौगोलिक दृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या सद्य परिस्थिती मध्ये करमाळा ते सोलापूर हे अंतर १३५ किलोमिटर आहे, हे अंतर अतिशय गैरसोयीचे असून करमाळा ते बार्शी ६५ किलोमिटर अंतर आहे. त्यामुळे तब्बल ७० किलोमिटर प्रवास आणि त्यासाठीचा वेळ वाचणार आहे. प्रवासासाठी करमाळा वासियांना बार्शी जिल्हा निर्मिती ही बाब सोयीची आहे.
परांडा ते उस्मानाबाद ७० किलोमिटर हे बार्शी अंतर कमी होऊन परांडा ते बार्शी ३० किलोमिटर भुम, वाशी, यांचीही अशीच परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे खूप दिवस प्रलंबित असलेली वैराग तालुक्याची मागणी पूर्ण होईल टेंभुर्णी , जेऊर, पाथरूड, येरमाळा, हे सुद्धा स्वतंत्र तालुके होणे आवश्यक आहे. सोलापूर उस्मानाबाद या जिल्हा प्रशासनावर असलेला अतिरिक्त कामकाजाचा ताण काम कमी होण्यास मदत होईल. बार्शी शहरात शैक्षणिक , वैद्यकीय, व्यापारी दृष्ट्या सोयी सुविधा तसेच पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटी सुसज्ज आणि जास्त संख्येने बस फेऱ्या असल्याने, सर्वानाच नव्याने बार्शी जिल्हा झाल्यास सोयीचा होणार आहे. त्यासाठी सर्व कुटुंबाचे मागणी पत्र , स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समित्या , नगर परिषदा, नगर पंचायती, सहकारी संस्था यांचे ठराव आणि मागणी पत्रे देणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष पंधरवडा राबविण्यात येणार असून एक लाख सह्यांचे निवेदन आणि समर्थन पत्रे मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
या विशेष कृती समिती मध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हावे असे आवाहन बार्शी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा जिल्हा निर्मिती कृती समितीचे निमंत्रक ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी आज बार्शी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी सोलापूर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जुगलकिशोर बापू तिवाडी यांनी विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा मूलभुत पाया आहे. त्याशिवाय सर्वांगीण विकास होऊ शकत नाही.हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा निर्मितीची संरचना करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे .त्यासाठी बार्शी जिल्हा निर्माण होणे का गरजेचे आहे याचा उहापोह केला याबाबत जाणीव जागृती साठी रथयात्रा सुर करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ, पुढील आठवड्यात सर्व पक्षाच्या नेते सर्व स्तरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना सहभागी करून करण्यात येणार आहे. अशी माहिती जुगलकिशोर तीवडी यांनी दिली. यावेळी सरचिटणीस दत्ताजीराव गाढवे, तालुका कार्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, सतीशराव पाचकुडवे, शहर उपाध्यक्ष निलेश मांजरे पाटील, काँग्रेस आरोग्य सेल जिल्हाअध्यक्ष वहाब फत्तेखान पठाण, ओ बी सी शहर अध्यक्ष विजय ठाकूर, युवक काँग्रेसचे संतोष शेट्टी, उपस्थित होते.
0 Comments