सुर्डी/प्रतिनिधी:
शिक्षक हे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता विद्यार्थ्यांना हस्तांतरित करतात, आचार करतात शैक्षणिक प्रक्रियापासून ते व्यक्तिमत्त्वाच्या निर्मिती आणि परिवर्तनावर काम करत असतात. शिक्षकांच्या सुट्टीचा विषय हा नेहमी चर्चिला जातो. बार्शी तालुक्यातील सुर्डीचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी सतरा वर्षापासून एकही सुट्टी न घेण्याचा पराक्रम केला आहे. सुर्डी येथील शेळके वस्ती शाळे तिल चिमुकल्यां सोबत शिक्षणाचे धडे गिरवण्याचे काम सत्यवान भडकवाड यांनी केले आहे. यातूनच शेळके वस्ती शाळेचा कायापलट देण्याचे काम शिक्षक भडकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत केले आहे.
गेल्या सतरा वर्षांपासून अविरतपणे ज्ञान देणारा शिक्षक...
२००३ साली जिल्हा परिषद परिषदेच्या योजनेतून निवासी झोपडी शाळा सुरू केली. यामुळे वस्तीवरील गोरगरीब व तळागाळातील लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रामुख्याने कार्य निवासी शाळेने केले. यामुळे वस्तीवरील चिमुकल्यांना शाळे संदर्भातील गोडी निर्माण झाली. याची सुरुवात शेळके वस्ती शाळेपासून शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी सतरा वर्षांपूर्वी केली होती. सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये अविरतपणे ज्ञान देण्याचे काम केले. यातूनच चिमुकल्यांच्या आवडीच्या विषयांना धरून ज्ञान देण्याचे काम भडकवाड गुरुजींनी केले..
शेळके वस्ती वरील सुट्टीतील शाळा..
शिक्षकांच्या सुट्टी विषयी नागरिकांमधून नेहमीच चर्चा होत असते. मात्र यातूनही शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी आपल्या शिक्षकी पेशाला सुट्टीचा कोणताही गंध लागू दिला नाही चिमुकल्यांना सोबत घेऊन सुट्टीच्या दिवशी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर भर दिला त्यांच्या आवडीच्या विषयांचे सादरीकरण केले शनिवार रविवार व इतर दिवशी सुट्टी तील शाळा भरण्याचे काम त्यांनी केले सुट्टीच्या दिवशी शाळेतील चिमुकल्यांना घेऊन शाळेची स्वच्छता आणि शोभा वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे लहान वयातच स्वच्छतेचे महत्व ही विद्यार्थ्यांना कळाले सुट्टीच्या दिवशी दोन ते तीन तास शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये घालवण्याचा आनंद सत्यवान भडकवाड यांनी घेतला.
लोकसहभागातून शेळके वस्ती शाळेला मिळाला 'नवा लूक'
जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शेळके वस्ती शाळेत राबवण्यात आला. त्यासंदर्भात लोकसहभागातून शाळेच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सहयोगी शिक्षकांकडून वर्गणीतून शाळेच्या रंगोटी कामाला सुरुवात केली. त्यामुळे शाळेच्या इमारती अधिकच सुंदर दिसत आहेत. कधी इमर्जन्सी रजा जरी घेतली तरी देखील शाळेत येणारे हे शिक्षक आहेत, मुलांकडे टॅब आणि ई लर्निंगच्या देखील सुविधा आहेत.
0 Comments