बार्शी/प्रतिनिधी:
गुळपोळी सोसायटीमध्ये सतिश उर्फ सदगुरू मच्छींद्र याने अपहार केल्याचे सिध्द झाले म्हणून निलंबित करण्यात आले याबाबत सूर्यकांत गोविंद चिकणे व जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर,मा प्रशासकीय अधिकारी डि सी सी बॅंक सोलापूर, सहकार आयुक्त पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकार संस्थां सोलापूर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्थां बार्शी, यांचे कडे तक्रारी अर्ज केले होते सतिश उर्फ सदगुरू मच्छींद्र चिकणे याच्या कालावधीतील दफ्तराची तपासणी करून अपहाराची चौकशी करून भा द वि 409,408,420,465,468,471,447,34 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
परंतु चाचणी लेखापरीक्षक डि टी गायकवाड यानी अहवालात नमुद केले आहे की गंभीर स्वरूपाचे मुद्दे निरीक्षणात नोंदविले आहेत, सभासदाकडून जादा व्याज आकारणे,बनावट सभासद करणे, बनावट कागदपत्रं तयार करणे व ती कागदपत्रं वापरणे, सभासदाकडून कर्ज भरून घेणे पावत्या न देणे,सभासदाकडून कर्ज वसूल करणे परंतु संस्थेत न भरणे व कर्ज माफीत नाव घालून सभासदाचे पैसेचा अपहार करणे इतर बाबीत दोशी धरणयात आले आहे म्हणून दिनांक 09/09/2021 रोजी मा जिल्हास्तरीय समिती ने ठराव क्र 4 अन्वये निलंबित करण्यात आले आहे व चाचणी लेखापरिक्षणातील दोषी आढळून आलेल्या मुद्याबाबत चौकशी सुरू करण्यात आलेली आहे म्हणून सचिव सतिश उर्फ सदगुरू मच्छींद्र चिकणे याला निलंबित करण्यात आले आहे .
0 Comments