करमाळा/प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील सौंदे येथे उडीद मळणी यंत्र मध्ये अडकून युवकाच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली आहे. केतन राजेंद्र वीर असे उडीद मळणी यंत्रात अडकून ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. केतन हा मळणी यंत्रात उडीद काढताना पाय मशीन मध्ये गेल्याने ही घटना घडली आहे.
मशीनमध्ये पाय गेल्यामुळे केतनच्या शरीराचे दोन तुकडे..
सौंदे येथील राजेंद्र वीर यांनी या वर्षीच ट्रॅक्टरसोबत उडीद काढण्याची पट्ट्याची मशीन आणली आहे. या मशीनवर केतन वीर हा उडिद काढण्याचे काम करत होता. उडीद काढताना मशीनमधील कचरा पायाने काढत होता. त्याचा पाय मशीनमध्ये गेला. तसे मशीनने त्याला ओढले. त्यामुळे मशीनमध्ये पाय तुटले व शरीर बाजूला पडून त्याचा मृत्यू झाला.
वीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वीर कुटुंबातील एकुलती एक करता मुलगा गेल्यामुळे वीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन विर हा व्यवसायासाठी सातत्याने धडपड करणारा एक मुलगा होता. त्याचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झाले होते. शेतीकडेही तो अत्याधुनिक पद्धतीने करण्यावर भर देत होता. मात्र अशा घडलेल्या घटनेने सौंदे गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments