पंढरपूर पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या


पंढरपूर/प्रतिनिधी:

आंतरराज्य मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीच्या पंढरपूर शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, जिल्ह्यातून ३१ मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत पोलिसांनी कर्नाटक राज्यातून एका जणाला अटक केली आहे. १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. 

या प्रकरणी राजू उर्फ गुडया मधुकर पवार.रा. सेन्ट्री चाळ,पिंपरी,जि, पुणे, मूळ रा. सारोळे,ता. मोहोळ,जि. पुणे आणि श्रीकांत मलकप्पा नडगिरे वय,२५रा.खजुरी ता. आळंद जि. गुलबर्गा कर्नाटक या दोघांवर गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून त्यांना अटक करण्यात आली. 

पंढरपूर प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारा श्रीकांत मलकप्पा नडगिरे याला ताब्यात घेण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चार जिल्ह्यातून  राजू उर्फ गुडया मधुकर पवार या  साथीदाराच्या साथीने तब्बल ३१ मोटर सायकल या चोरल्याची कबुली दिली. यामध्ये एक लाख रुपयांच्या बुलेट पासून ते ते पन्नास हजार रुपयांच्या किमतीच्या मोटरसायकली दोघांनी मिळून चोरल्या होत्या. पुणे येथून १६ मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मोटरसायकल तीन जिल्ह्यात विक्री करण्यात आली होती. या सर्व ३१ मोटर सायकलची किंमत १८ लाख रुपये आहेत. दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधिकारी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments