नितीन पवार याने पॅरोलवर तुरुंगाबाहेर आल्यावर ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. अंबड पोलिसांनी अटकेची कारवाई केली. कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
नितीन पवार याने २०१३ मध्ये सिडकोतील शिवाजी चौक येथे त्याच्या नात्यातील दोन महिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणात त्याला जन्मठेप झाली. कोरोना काळात पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या नितीन पवारने सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार केला. चाकूचा धाक दाखवून नितीन पवारने आधी महिलेवर जबरदस्ती केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार उजेडात येताच पोलीस सक्रीय झाले आणि तपास करुन नितीन पवारला अटक करण्यात आली.
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, घरफोडी, हत्या, दरोडा असे गुन्हे वारंवार घडत असतात. पण ताज्या घटनेत ब्युटी पार्लरमध्ये घुसून बलात्कार झाल्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. अखेर शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी अंबड पोलीस ठाण्याला भेट दिली आणि बलात्कार प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला तसेच तपास पथकाला सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करुन नितीन पवारला अटक केले.
0 Comments