सलग दोन वेळा पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या पदरी अखेर यश आले आहे. अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स इलेव्हन वर विजय मिळवला आहे.
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सला बदल करावे लागले होते. ईशान्स किशनला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी सौरभ तिवारीला संधी देण्यात आली होती. सौरभने संधीचं सोनं करत ४५ रन्सची दमदार खेळी केली. यात त्याने २ सिक्स आणि ३ चौकार लगावले. तर क्विंटन डिकॉक २७ रन्सची खेळी केली.
परंतु, कॅप्टन रोहित शर्माने मात्र या सामन्यात निराशा केली. अवघे ८ रन्स करून तो माघारी परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादवही फार काही कमाल करू शकला नाही, तोही माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि पोलार्डने दमदार खेळी करत विजयाचा मार्ग सोपा केला. हार्दिकने तडाखेबाज फलंदाजी करत ४० रन्स केले आणि टीमला विजय मिळवून दिला.
त्याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पंजाबला पहिली बॅटिंग करण्याची संधी दिली. पंजाबने १३५ धावांचे माफक आव्हान उभे केले. पण, टॉप ऑर्डर सपशेल फेल ठरली. मनदीप सिंह १५ रन्स करून आउट झाला तर क्रिस गेल फक्त १ रन करून माघारी परतला. केएल राहुलने २१ रन्स केले आणि आउट झाला. निकोलस पूरन याही मॅचमध्ये खास अशी कामगिरी करू शकला नाही फक्त २ रन्स करून तो माघारी परतला.
0 Comments